Saturday, April 23, 2011

आत्मप्रतिसाद

आत्मप्रतिसाद

रम्य सांज वेळ ती, रम्य नदी किनार
मंद उपरा वारा, धुंद ते शिवार

कोण मज बोलावी, कोण देतसे साद
ओळखीचा सूर तो, तो मनोहारी नाद

वेणू वाजे मधुर माझ्या आत की बाहेर
मन छेडी अखंड आनंदाची तार

थबकती पाऊले माझी जाता जाता
हरिस्तव उमटे आत्मप्रतिसाद

- गणेश देवळे, २२ एप्रिल, २०११